या निधीतून पालिके अंतर्गतच्या ईदगाहस संरक्षण भिंत व सुशोभिकरण करणे ९० लाख, शहर अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी ५५ लाख, गिताई नगर ते फुलसे घर ते सांगवीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे १५ लाख, बँक कॉलनी येथे परगे यांच्या
घरापासून प्रशांत भोसले ते जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी १० लाख, नागोबा नगर येथील लहू पाटील ते संजय पुरी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी १० लाख, शिवाजी नगर येथील करंडे पाटील यांचे घर ते बालाजी आगलावे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व
नाली बांधकामासाठी १० लाख, नागेश कॉलनीतील भगनुरे यांचे घर ते अनिल महामुनी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करण्यासाठी १५ लाख, त्रिवेणी नगर येथे चामे यांचे घर ते गोरे यांचे घर व बाबूराव मुसळे यांचे घर ते किरण यांच्या
घरापर्यंत सिमेंट रस्ता करण्यासाठी १५ लाख, चामे नगर येथील कैलास क्षीरसागर यांचे घर ते थोडगा रोडसाठी ५ लाख, अलिम शेख यांचे घर ते खतिब यांचे घर व आलिपाशा यांचे घर ते आराफात मज्जीदपर्यंतचा सिमेंट रस्ता करण्यासाठी १५ लाख, मिरकले नगर येथे लातूर- नांदेड रस्ता ते व्यंकट गुडगे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करण्यासाठी १० लाख असा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.