...
निवडीबद्दल हाजी सराफ यांचा सत्कार
निलंगा : औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय सभापती म्हणून काँग्रेसचे हाजी सराफ यांची निवड झाल्याने त्यांचा निलंगा येथे काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. दयानंद चोपणे, बाळासाहेब देशमुख, असलम झारेकर, बबर पठाण, बबलू जाधव आदी उपस्थित होते.
...
मिरगन हळ्ळी येथे कोविड लसीकरण
निलंगा : तालुक्यातील कासार बालकुंदा प्राथमिक आरोग्य केंद्र व मिरगन हळ्ळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावात कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात १३३ जणांना लस देण्यात आली. यावेळी माजी सरपंच ओम बिरादार, सरपंच बंडेप्पा फुलारी, उपसरपंच संदीप औरादे, ग्रामसेवक हणमंते यांच्यासह गावातील योगेश बिरादार, रंजित फुलारी, विनोद येवते, अनिल फुलारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
...
घोणसी शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
जळकोट : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सुरू केलेल्या बाला उपक्रमास तालुक्यातील घोणसी येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. गटसमन्वयक के.पी. बिरादार यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांनी आपले महिन्याचे वेतन देण्याचा संकल्प केला. आतापर्यंत ५० हजाराचा खर्च करण्यात आला आहे.