शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी चौघांचा चाकूर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

By संदीप शिंदे | Updated: May 24, 2024 16:46 IST

पाण्याच्या मागणीसाठी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला.

चाकूर : तालुक्यातील हणमंत जवळगा येथे पाण्याची समस्या गंभीर बनली असून, पाण्याचे नियोजन करावे, हिंपळनेर येथील काही लोकांनी पाणी पुरवठा योजनेवरील पाईपलाईन, पॅनल बोर्डची तोडफोड केली, त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून प्रशासनाकडे ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. मात्र, दखल न घेतल्याने शुक्रवारी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला. यावेळी चौघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असून, पोलिसांनी त्यांना तातडीने रोखल्याने अनर्थ टळला.

हिंपळनेर येथील साठवण तलावातून हणमंत जवळगा गावाला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. हिंपळनेर गावातील काही नागरिकांनी या पाणीपुरवठा योजनेवरील पाईपलाईन, मोटार, पॅनल बोर्ड आदींचे नुकसान केले आहे. त्यामुळे हणमंत जवळगा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली असून, गावातील लोकांना उन्हाच्या चटक्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. त्यावर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे धाव घेऊन निवेदनाद्वारे गाऱ्हाने मांडले. त्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची नासधूस करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, हणमंत जवळगा गावचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरु करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही.

अखेर ग्रामस्थांनी ही समस्या तातडीने सोडवावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला होता. शुक्रवारी गावातील विठ्ठल उदगिरे, रामदास बालणे, तुकाराम केंद्रे, व्यंकट बेडदेसह पाचशेंहून अधिक पुरुष-महिला पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. त्यापैकी चौघांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या हातातील डिझेलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या. त्यामुळे पुढील अनार्थ टळला आहे. याप्रसंगी तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलिस निरिक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरिक्षक कपिल पाटील यांनी आंदोलनकर्त्याना शांततेचे आवाहन केले.

पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार...हणमंत जवळगा येथील पाणीपुरवठा योजनेची नासधूस केली असून, त्यातील दोषीवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हणमंत जवळगा गावचा पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, पंचायत समितीच्या आवारात पोलिस निरिक्षक दत्तात्रय निकम यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. यावेळी पोहेकॉ मारोती तुडमे, दत्तात्रय लांडगे, रितेश आंधूरकर, रविंद्र पेद्देवाड, पुनम शेटे, धोंडापूरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर