शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लातूर जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, मांजरा धरणात मात्र ४८.१७ टक्के पाणीसाठा 

By राजकुमार जोंधळे | Updated: September 16, 2022 17:00 IST

सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बॅराजेस, विहिरींना पाणी आले.

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६९६.६ मिलीमीटर पाऊस पडला असला असून, लातूरला पुरवठा होणाऱ्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात अद्यापही ४८.१७ टक्क्यावरच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे धरण शंभर टक्के भरण्यासाठी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे. 'मांजरा'च्या तूलनेत निम्न तेरणा धरण मात्र पुर्ण क्षमतेने भरत आले आहे. यात सध्याला ९६.९३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बॅराजेस, विहिरींना पाणी आले. मांजरा नदीवरील बोरगाव अंजनपूर, टाकळगाव, देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव, नागझरी, साई, खुलगापूर, शिवणी, बिंदगीहाळ, डोंंगरगाव, धनेगाव, होसूर व भूसनी बॅरेजसमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मांजरा नदीवरील १५ बॅरेजस भरले आहेत. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात होईल, असा पाऊस झाला नाही. परिणामी, पावसाळयाचे तीन महिने संपले तरी धरणात केवळ ४८.१७ टक्क्यावरच पाणीसाठा आहे.

मांजरा धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर आहे. एकुंण पाणीसाठा २२४.०९३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणात ६३९.७४ मीटर पाणीपातळी आहे. एकुण पाणीसाठा १३२.३६६ दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त साठ्याची टक्केवारी ४८.१७ आहे. 

चार मध्यम प्रकल्प भरले...लातूर जिल्ह्यातील व्हटी, देवर्जन, साकोळ आणि घरणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर तावरजा मध्यम प्रकल्पात ७२.२२ टक्के, रेणा प्रकल्पात ९८.१२ टक्के, तिरु प्रकल्पात ८१.२३ टक्के तर मसलगा मध्यम प्रकल्पात ८३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांत एकुण ९०.९२ टक्के उपयुक्त पाणी आहे. १३२ लघु प्रकल्पांत ८७.९० टक्के तर जिल्ह्यातील एकूण १४२ प्रकल्पांत ७९.६२ टक्के उपयुक्त साठा आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस