पानगावात चार कावळे दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:02+5:302021-01-14T04:17:02+5:30

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, चिताडे गल्ली परिसरात १२ आणि १३ जानेवारी रोजी चार ...

Four crows were killed in Pangaon | पानगावात चार कावळे दगावले

पानगावात चार कावळे दगावले

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, चिताडे गल्ली परिसरात १२ आणि १३ जानेवारी रोजी चार कावळे अचानक बेशुध्दावस्थेत रस्त्यावर काेसळले. काही कावळे मृतावस्थेत, तर काही बेशुद्ध असल्याचे आढळून आले. खाली काेसळ्यानंतर काही वेळाने हे कावळे मृत्यू पावल्याची घटना घडली. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी याची माहिती पानगाव येथील पशुसंवर्धन विभागाच्या राजकुमार सिरसाठ यांना दिली. या चार कावळ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रेणापूर येथे नेण्यात आले. ही वैद्यकीय तपासणी रेणापूर येथील तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. हणुमंत गायके यांनी केली. या चारही कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे समाेर आले आहे. असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जे. आर. केकान यांनी सांगितले.

Web Title: Four crows were killed in Pangaon