भगवान विद्यालयात मुख्याध्यापक दिनकर मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी एस.पी. मुंडे, मदन कराड, दत्तात्रेय दहिफळे, बंकट दराडे, कविता माळी आदींची उपस्थिती होती.
मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत डॉ. पांडुरंग टोम्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्राचार्या शोभाताई टोम्पे, सुदर्शन तांदळे, माधव भिंगे, रामचंद्र कुंटे, राजेश काडवदे, मनोजकुमार धुप्पे आदी उपस्थित होते.
संत मोतीराम महाराज माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात संस्था सचिव प्रा. नरहरी फड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्राचार्य सागरताई घुले, भाऊसाहेब मुंढे आदींची उपस्थिती होती.
नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य प्रकाश कळसाईतकर, पीर गैबीबाबा उर्दू शाळेत मुख्याध्यापक नसीबोद्दीन जाहगीदार, भागिरथी विद्यालयात प्राचार्य संभाजी मुरकुटे, वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक प्रशांत गुळवे, जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापक सुभाष गव्हांडे, ग्रामपंचायतीत सरपंच किशोर मुंडे, पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर, सोनखेड-मानखेड येथील नूतन जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य शिवाजीराव दहिफळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. बालाजी मुसळे, खंडेराव येलकटवाड, के.एस. कसादे, एस.पी. गुंडरे, पी.व्ही. काळे आदी उपस्थित होते.