शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनांची चाेरी करणाऱ्या आंतर जिल्हा टाेळीतील पाच जणांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: July 23, 2023 20:56 IST

वाहनासह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर: पशुधनांची चाेरी करणाऱ्या टाेळीतील पाच जणांना चाकूर पाेलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. रात्रीच्या गस्तदरम्यान हे चाेरटे पाेलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून चाेरीतील पशुधन आणि वाहन असा ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, चाकूर ठाण्याच्या हद्दीत रात्री गस्तीवर असलेल्या पाेलिसांना झरी (खु.) गावानजीक संशयास्पद पिकअप वाहन दाेन गायी घेऊन भरधाव जाताना आढळून आले. त्या वाहनाला पाेलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वेग वाढवत पलायन केले. याची माहिती चाकूर उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळाली. उपविभागातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहन ताब्यात घेतले. झाडाझडती घेत सखाेल चाैकशी केली असता, त्यांनी झरी गावातून या गायी चाेरल्याची कबुली दिली. अधिक चाैकशी केली असता त्यांनी चाकूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून यापूर्वी चारवेळा साथीदाराच्या मदतीने पशुधनांची चाेरी केल्याचे सांगितले.

याप्रकरणी ज्ञानोबा नागनाथ मोहाळे (रा. कातकरवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), मारुती दंतराव हरगिले (रा. कासारवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी), राजू नारायण पोपतवार (रा. लांजी ता. अहमदपूर जि. लातूर), शेख कलीम शेख बुऱ्हान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, पूर्णा जि. परभणी) आणि इरफान उस्मानसाब कुरेशी (रा. बागवान गल्ली, अहमदपूर जि. लातूर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चाेरीतील दाेन गायी, दाेन म्हशी, एक वासरू, एक बैल असे सहा पशुधन, गुन्ह्यातील वाहन असा ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरवाडे, पोलिस उपनिरीक्षक मोरे, अंमलदार शिरसाठ, मस्के, वाघमारे, लांडगे, पेद्देवाड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूर