एका १४ वर्षांच्या मुलीला जन्मजात हृदयरोग होता. ती चालल्यानंतर दम लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, असा त्रास होत होता. हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये हृदयाची एक झडप लहान होऊन पुढील रक्तस्रावास अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. तिच्यावर लातुरातील डॉ. दुबे यांच्या न्यू लाइफ हार्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना पायातील नसामधून बलून वापरून हृदयातील झडप यशस्वीरीत्या पूर्णपणे उघडण्यात आली आहे. डॉ. बी.जी. दुबे, डॉ. पंकज सुगावकर, डॉ. गोपाळ वैजवाडे यांनी यशस्वी उपचार केले आहेत. दुसऱ्या दिवशी रुग्णाला सुटी देण्यात आली.
पुणे येथील लहान बालकांचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर (इंटरव्हेशनल बालहृदयरोगतज्ज्ञ) यांची दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी हॉस्पिटलला भेट असते. दुर्मीळ आणि लहान मुलांमधील आजारांचे उपचार व निदान न्यू लाइफ हार्ट हॉस्पिटलमध्ये केले जातात. गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
(वाणिज्य वार्ता)