बाळासाहेब जाधव, लातूरगतवर्षी पावसाची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नसल्याने शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात शासनाकडे जुलै, आॅगस्ट २०१३ मध्ये २ कोटी ४0 लाख ५२ रूपये भरले़ त्या भरलेल्या पीक विम्यापोटी २ लाख ६४ हजार रूपये मिळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे़खरीप हंगाम जुलै व आॅगस्ट २०१३ च्या कालावधीत विमा कंपनीस खरीप हंगामातील साळ, संकरीत ज्वारी, बाजरी, भुईमुग, सुर्यफुल, सोयाबीन, तीळ, कारळ, तूर, उडीद, मुग, कापूस, ऊस आदी पिकापोटी, लातूर जिल्ह्यातील १ लाख १३ हजार २७९ सभासदांनी जिल्हा बँकेत पीक विमा भरला़ या भरलेल्या पीक विम्यापोटी २ कोटी ६४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला़ या पीक विम्यापोटी नुकसानभरपाई म्हणून चांगली मदत येणार अशी शेतकऱ्यांची अशा होती़ परंतु विमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औसा, अहमदपूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, उदगीर, जळकोट, देवणी, चाकूर या तालुक्यात शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी रक्कम भरली़ परंतु भरलेल्या रकमेच्या प्रमाणात रक्कम मिळाली नाही़ जळकोट तालुक्यातील पाच हेक्टर कार्यक्षेत्र असलेल्या दोन शेतकऱ्यांना व चाकूर तालुक्यातील ७३़२३ हेक्टर कार्यक्षेत्र असलेल्या १९६ शेतकऱ्यांना २ लाख ६४ हजार ३५२ एवढा पीक विमा फक्त तूर या एकाच पिकासाठी मंजूर झाला आहे़ तर इतर तालुक्याला मात्र या पिकविम्यातून वगळण्यात आले आहे़
भरले अडीच कोटी मिळाले अडीच लाख
By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST