शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची रिक्त पदे भरा; ग्रामस्थांनी ठाेकले शाळेला कुलूप, विद्यार्थ्यांचा मैदानात ठिय्या

By संदीप शिंदे | Updated: August 12, 2024 16:10 IST

रेणापूर तालुक्यातील खलग्री जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

रेणापूर : तालुक्यातील खलंग्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक व एक शिक्षकाचे पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत पालक, ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे पदे भरण्याची मागणी केली. मात्र, दखल घेण्यात न आल्याने सोमवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठाेकून सामुहिक बहिष्कार टाकला.

खलंग्री येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेतील विद्यार्थी पटसंख्येसाठी ६ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यामध्ये मुख्याध्यापक, तीन प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर दोन शिक्षकांचा समावेश आहे. मात्र, गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून शिक्षक नाहीत. तसेच प्रतिनियुक्तीवर एक शिक्षक कोस्टगाव येथे कार्यरत आहे. तरीही दोन पदे रिक्त असून, ही पदे भरण्यात यावीत यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष व सरपंच महानंदा करमुडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेणापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पदे भरण्याची मागणी केली. मात्र, दखल घेतली नसल्याने सोमवारी शाळेला कुलूप लावून सामुहिक बहिष्कार टाकण्यात आला.

शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांचा ठिय्या...जोपर्यंत रिक्त पदे भरली जाणार नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून, शाळेला कुलुप लावुन विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात ठिय्या मांडला. जोपर्यंत शिक्षकांची पदे भरली जाणार नाहीत, तोपर्यंत शाळेच्या आवारातच विद्यार्थी बसणार आहेत, असे रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे यांनी सांगितले. तात्काळ रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा