शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी ऊस वाळण्याची भिती, गुऱ्हाळाकडे वळली शेतकऱ्यांची पाऊले

By संदीप शिंदे | Updated: January 13, 2024 17:13 IST

यंदा पावसाचे कमी प्रमाण झाल्याने ऐन शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाण्याची चणचण भासत आहे.

हाळी हंडरगुळी (लातूर) : परिसरातील काही शेतकऱ्यांचा कल गुळ उत्पादनाकडे पूर्वीपासूनच आहे. यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने ऊस वाळण्याच्या भितीपोटी शेतकरी गूळ गाळपाकडे वळत असल्याचे चित्र आहे.

हाळी हंडरगुळी गावांसह परिसरातील चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, सुकणी, वाढवणा बु., वाढवणा खु., शिवणखेड, कुमठा, वडगाव, वायगाव आदी शिवारात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र यंदा पावसाचे कमी प्रमाण झाल्याने ऐन शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे जेवढे लवकर असेल तेवढ्या लवकर ऊस शेतातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यातील विकास सहकारी साखर कारखाना युनिट-२ व शेजारील तालुक्यातील बालाघाट शेतकरी साखर कारखाना यांचे गाळप सुरु असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी धावपळ करत आहेत. परंतु तारखेची मुदत संपण्याच्या आतील ऊस कारखाना नेत नसल्याने तसेच ६७१, ८६०३२ या जातीच्या ऊसाला कारखाना प्राधान्य देत असल्याने व पाण्याअभावी ऊस वाळेल या भितीपोटी काही शेतकऱ्यांची मानसिकता गुऱ्हाळाकडे वळली आहे. सध्या हाळी हंडरगुळी परिसरात जवळपास १५ ते २० ठिकाणी गु्ऱ्हाळे सुरु आहेत. सध्या गुळाला प्रति क्विंटल ४००० ते ४२०० रुपये भाव आहे.

गुऱ्हाळ चालविणे झाले जिकरीचे...पावसाचे कमी होत चाललेले प्रमाण, मजुरांची टंचाई, खते व औषधांच्या वाढलेल्या किंमती यामुळे गुऱ्हाळे चालवणे अवघड झाले असल्याचे चिमाचीवाडी येथील रामराव गुणाले यांनी सांगितले. तर दरवर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन होते. मात्र गुळ साठवण्यासाठी या परिसरात वेअर हाऊस नसल्याने गुळाची साठवण करुन ठेवता येत नाही. त्यामुळे व्यापारी बेभावाने गुळ खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाकडे वेअर हाऊस उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याचे दयानंद गुद्दे यांनी सांगीतले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर