शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

खुन प्रकरणात मुलगा अटक झाल्याने पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 17:34 IST

आत्महत्येपूर्वी मित्रांना केला होता फोन

ठळक मुद्देलातुरातील भांबरी चौकातील खुनाच्या आरोपात मुलगा अटकेत मुलामुळे माझी इज्जत गेली़

किल्लारी (जि़ लातूर) : लातुरातील भांबरी चौकातील खून प्रकरणात मुलास अटक झाल्याने नदी हत्तरगा (ता़ निलंगा) येथील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष तिमन्ना शिंदे (५८) यांनी विषारी औषध प्राशन करुन उमरगा (जि़ उस्मानाबाद) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळरानावर आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली़

लातुरातील भांबरी चौकात बुधवारी कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी होऊन अरुण भरत राठोड व आनंद दिलीप चव्हाण यांच्यावर चाकूने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी सागर सुभाष शिंदे याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता़ सागर शिंदे याच्यासह अन्य एकास पोलिसांनीअटक केली होती़

खून प्रकरणातील आरोपी सागर शिंदे हा निलंगा पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष तिमन्ना शिंदे (५८, रा़ नदी हत्तरगा, ता़ निलंगा) यांचा मुलगा आहे़ सुभाष शिंदे हे गावातील तंटे स्वत: पुढे होऊन सोडवित असत़ तसेच गावातील गोरगरिबांच्या अडचणीच्यावेळी धावून जात असत़ दरम्यान, आपला मुलगा खून प्रकरणात अटक केल्याचे समजात तो त्यांच्या जिव्हारी लागला़ त्यामुळे त्यांनी गुरुवारी सायंकाळी उमरगा (जि़ उस्मानाबाद) नजीकच्या आचलबेट येथील माळरानावर जाऊन मुलामुळे माझी इज्जत गेली़ त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे गावातील मित्रांना फोन करुन सांगितले. 

गावातील मित्रांनी आचलबेट माळरानावर जाऊन त्यांचा शोध घेतला़ परंतु, ते सापडले नाहीत़ दरम्यान, यासंदर्भात उमरगा पोलिसांना माहिती दिली़ पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन बेटजवळगा येथील माळरानावर जाऊन पाहणी केली़ तेव्हा रस्त्यानजीकच्या झुडुपाजवळील कारमध्ये सुभाष शिंदे यांचा मृतदेह आढळून आला़ त्यांचे शवविच्छेदन उमरगा येथील रुग्णालयात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याArrestअटकPoliceपोलिसlaturलातूर