शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बाप न तू 'जल्लाद'! चॉकलेटसाठी पैसे मागितले म्हणून बापानेच साडीने आवळला मुलीचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:15 IST

लातूर जिल्ह्यातील भीमा तांडा येथील घटना

उदगीर (जि. लातूर) : चाॅकलेटसाठी पैसे मागणारी चार वर्षीय मुलगी आरुषीचा जन्मदात्याने साडीने फाशी देत खून केल्याची घटना भीमा तांडा (ता. उदगीर) येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात आराेपी पित्याविराेधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी वर्षा बालाजी राठोड हिचा विवाह २०१९ मध्ये भीमा तांडा येथील बालाजी बाबू राठोड याच्यासोबत झाला होता. दरम्यान, त्यांना एक मुलगा आर्यन, एक मुलगी आरुषी अशी दाेन अपत्ये झाली. फिर्यादीचा पती बालाजी बाबू राठोड याला दारूचे व्यसन जडले हाेते. यावरुन दाेघा पती-पत्नीमध्ये सतत वाद, भांडण होत असत. ताे दारू पिल्यावर पत्नीला मारहाण करून मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. या भीतीपोटी फिर्यादी पत्नी वर्षा ही तीन महिन्यापूर्वी माहेरी निघून गेली होती. दरम्यान, ९ जून २०२५ रोजी पती बालाजी हा सासरवाडीत जाऊन मुलगी आरुषीला जबरदस्तीने भीमा तांडा येथे घेऊन आला होता. रविवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास पत्नी वर्षा यांच्या काकाच्या मोबाईलवर सासू मंगलबाई बाबू राठोड हिने फोन करून सांगितले. तुझा पती बालाजी याने मुलगी आरुषी हिला राहत्या घरात साडीने फाशी देत ठार मारले आहे. मुलीला उदगीर येथील शासकीय रुग्णालयात नेले आहे. ही घटना कळल्यानंतर फिर्यादी पत्नी वर्षाने उदगीर येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मुलगी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

फिर्यादीचा पती बालाजी राठोड याने पाेटच्या चार वर्षीय मुलीने चॉकलेटसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन साडीने फाशी देऊन तिचा खून केला, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी पती बालाजी राठाेड याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी आराेपीला ताब्यात घेतले असून, तपास पोलिस उपनिरीक्षक रायपल्ले हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर