शेती मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे कोलमडले अर्थचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:26+5:302021-05-11T04:20:26+5:30

अहमदपूर : इंधनाचे दर वाढल्याने यंत्रावरील शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. परिणामी, शेतीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत ...

Farmers' economic cycle collapses due to increase in cultivation rates | शेती मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे कोलमडले अर्थचक्र

शेती मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे कोलमडले अर्थचक्र

Next

अहमदपूर : इंधनाचे दर वाढल्याने यंत्रावरील शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. परिणामी, शेतीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. दरवाढ झाली असली तरी बैलबारदाणा ठेऊन शेती करणे परवडत नसल्याने नाईलाजास्तव शेतकरी यंत्राचा वापर करीत आहेत.

पूर्वी शेतकरी शेतीकामे बैलांच्या मदतीने करीत. त्यामुळे मशागतीसाठी फारसा खर्च येत नव्हता. शेती जास्त असल्याने बैलजोडी सांभाळणे शक्य होत असे. मात्र, बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण झाले आणि शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागला. मागील दशकापासून यंत्राचा वापर वाढल्याने चार दिवसांत व्हायची कामे आता काही तासात पूर्ण होऊ लागली. एक पीक काढले की एका दिवसात मशागत करून दुसऱ्या पिकासाठी जमीन तयार केली जात आहे. नांगरणी, कोळपणी, फवारणी, वाहतूक, रोटा फिरवून गवत कापणे अशी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत बचत झाली. मात्र शेतीसाठीचा खर्च वाढला.

सध्या इंधनाचे दर वाढल्याने व्यावसायिक ट्रॅक्टर मालकांनीही मशागतीचे दर वाढविले आहेत. परिणामी, शेतीचे

उत्पादन आणि वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. ट्रॅक्टरद्वारे शेती मशागत परवडत नसली तरी काळानुसार बैलांच्या मदतीने शेती करणेही शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाईलाज होत आहे.

डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम...

डिझेल भाव वाढल्याने शेती मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. भाव असला ती खरेदी होत नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची होत आहे. त्यातच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. यंदा बहुतांश शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यानंतर बाजारपेठेत दर ७ हजारांपेक्षा अधिक झाले. ही भाववाढ व्यापाऱ्यांना फायदेशीर ठरते, असे हडोळती येथील शेतकरी वसंत पवार यांनी सांगितले.

मशागतीचे प्रकार यापूर्वीचे दर सध्याचे दर

नांगरणी १३०० १७००

रोटा मारणे ९०० १२००

मोगडा १००० १३००

सरी सोडणे ९०० ११००

पंजी ८०० ११००

Web Title: Farmers' economic cycle collapses due to increase in cultivation rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.