शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

थकीत सिंचन विहिर अनुदानासाठी शेतकर्‍यांनी देवणी नगर पंचायतीस ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:43 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ३९ शेतकर्‍यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या़ त्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत़ परंतु, त्याचे अनुदान तसेच मजुरांचा रोजगार थकित आहे. हे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आज संतप्त शेतकर्‍यांनी  नगर पंचायतीस टाळे ठोकले.

देवणी (लातूर): महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ३९ शेतकर्‍यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या़ त्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत़ परंतु, त्याचे अनुदान तसेच मजुरांचा रोजगार थकित आहे. हे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आज संतप्त शेतकर्‍यांनी  नगर पंचायतीस टाळे ठोकले.

सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना अनुदानावर विहीर मंजूर केली जाते़ सन २०१३-१४ मध्ये तालुक्यातील ३९ शेतकर्‍यांना मग्रारोहयोअंतर्गत विहीर मंजूर झाल्या़ त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी विहीर खोदकामास सुरुवात केली़ खोदकामानुसार निधी मिळणे अपेक्षित असताना त्याचे वितरण करण्यात आले नाही़ परिणामी, पैश्याअभावी काही शेतकर्‍यांनी विहीर खोदकाम करणे बंद केले़ त्यातच देवणी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले़ त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण झाली़दरम्यान, लाभार्थी शेतकर्‍यांनी अनुदान मिळावे म्हणून वारंवार संबंधित कार्यालयाकडे हेलपाटे मारुन निधी देण्याची मागणी केली़ परंतु, अनुदान देण्यात आले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी राजकीय पक्ष, संघटनांसमवेत सोमवारी नगरपंचायतीस टाळे ठोकले़

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी