शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या उजनी कार्यालयात शेतक-याने केले विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:14 IST

कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले

उजनी (लातूर) : कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, शेतक-याची प्रकृती चिंताजनक असून, लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी धिरु राठोड (४२) यांना ६० हजार रुपयांचे कृषी पंपाचे वीजबिल आले आहे. सदर बिल कमी करून द्यावे म्हणून त्यांनी उजनी येथील महावितरण कार्यालयात अनेकदा खेटे मारले. मात्र संबंधित अभियंत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहाजी राठोड पुन्हा मंगळवारी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आले. मला वीजबिल कमी करून दिले नाही, अनेकवेळा मागणी केली तरी ते कमी केले जात नाही, असे म्हणत विषारी द्रव असलेली बाटली काढून द्रव प्राशन केले. यावेळी महावितरणच्या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, एकंबी तांडा येथील सरपंच शिवराज राठोड यांनी त्यांना उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, बेलकुंड येथील पोलीस चौकीचे अंमलदार एन.टी. कोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सदर शेतकºयाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सरपंच शिवराज राठोड यांनी सांगितले. उजनी येथील महावितरणचे शाखा अभियंता किरण क्षीरसागर म्हणाले, मंगळवारी मी कार्यालयात नव्हतो. कामानिमित्त आशिवला होतो. विषारी द्रव कोणत्या शेतकºयाने घेतले याची माहिती आपणाला नाही. शिवाय, आपल्याकडे बिलासंदर्भात कसलीही तक्रार आलेली नाही. ज्या शेतकºयांचे जास्त बिल आहे, त्यांना आपण हप्ते पाडून देतच असतो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्या