शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

लिपिकाच्या नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखाला गंडा; भामटा जाळ्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: June 2, 2023 16:49 IST

पाेलिसांची कारवाई : लातुरात एकाला उचलले...

लातूर : लिपिकाची नाेकरी देताे असे आमिष दाखवून फसवणूक करणारा भामटा लातूर पाेलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला असून, पाेलिसांनी त्याला आज सकाळी अटक केली आहे. याबाबत पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील दयानंद गेटनजीकच्या होस्टेलमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेणाऱ्या एका ३१ वर्षीय विद्यार्थ्याने पाेलिसात धाव घेतली. लातूर पाेलिस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदाच्या तीन जागा रिक्त असून, त्या ठिकाणी मी तुला नाेकरी लावताे असे आमिष दाखवत, विश्वास संपादन करून परभणी जिल्ह्यातील एकाकडून तीन लाख रुपयांची रक्कम उकळली. विशेष म्हणजे, तक्रारदार विद्यार्थी आणि फसविणारा आराेपी हे एकाच गावचे रहिवासी आहेत. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुरनं. २४०/२०२३ कलम ४२० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, अंमलदार राजाभाऊ मस्के, नवनाथ हासबे, तुराब पठाण, जमीर शेख, माधव बिल्लापट्टे यांच्या पथकाने केली.

हाॅटेलात लावला पाेलिसांनी सापळा...तक्रारदार विद्यार्थ्याला आज सकाळी आराेपी पोलिस अधीक्षक कार्यालयालगत हॉटेलात भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेलमध्येच सापळा लावला. ठरल्याप्रमाणे आराेपी तक्रारदार विद्यार्थ्याला भेटण्यासाठी हॉटेलात आला. त्यावेळी त्याला पोलिसांनी अलगद ताब्यात घेत, अधिक चाैकशी केली. नवनाथ महादेव सावंत (वय २०, रा. कोदरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे त्याने स्वत:चे नाव सांगितले. चाैकशीत त्याने तक्रारदार विद्यार्थ्याला नाेकरीचे आमिष दाखवत तीन लाख रुपये उकळल्याची कबुली दिली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी