शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या मागणीसाठी हाती तिरंगा घेऊन माजी सैनिक टॉवरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 20:45 IST

दुष्काळाच्या मागणीसाठी औसा तालुक्यातील मंगरुळ येथील माजी सैनिक मनोहर पाटील हे मंगळवारी सकाळी ७ वाजता हाती तिरंगा घेऊन मोबाईल टॉवरवर चढले आहेत.

किल्लारी/नांदुर्गा : दुष्काळाच्या मागणीसाठी औसा तालुक्यातील मंगरुळ येथील माजी सैनिक मनोहर पाटील हे मंगळवारी सकाळी ७ वाजता हाती तिरंगा घेऊन मोबाईल टॉवरवर चढले आहेत. त्यांनी तेथेच उपोषणाला सदर मागणीसाठी प्रारंभ केला आहे. जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.दुष्काळ जाहीर करावा, पशुधनांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, चारा-पाण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी माजी सैनिक मनोहर पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. घटनास्थळी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी दाखल झाले आहेत.मी काही आत्मदहन करण्यासाठी या टॉवरवर चढलो नाही, तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन करीत आहे. या भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी शासनाने तातडीने करावी. रबीची पेरणी हातून गेली आहे. खरिपाचे पीक हाती लागले नाही. शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट आहे. लातूर जिल्ह्यातील एकमेव शिरुर अनंतपाळ तालुक्यात शासनाने मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे. हा निर्णय लातूर जिल्ह्यातील जनतेवर अन्यायकारक आहे, असे माजी सैनिक मनोहर पाटील म्हणाले. या आंदोलनाची दखल घेऊन गुबाळ, नांदुर्गा, मंगरुळ येथील ग्रामसेवक बिराजदार, तलाठी विजयकुमार उस्तुरे, नांदुर्गा येथील तलाठी किरणसिंग गहिरवार, पोलीस पाटील, ग्रामस्थ टॉवर परिसरात दाखल झाले आहेत. मात्र जोपर्यंत आपणास लेखी हमी दिली जाणार नाही, तोपर्यंत टॉवरवरील उपोषण थांबविणार नाही, अशी भूमिका माजी सैनिक मनोहर पाटील यांनी घेतली आहे.