लातूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समाजातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे होते. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून आचरणात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी येथे केले. राजर्षी शाहू महाविद्यालय येथे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. मंचावर उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, डॉ. कल्याण सावंत, प्रा. डॉ. पी. एस. त्रिमुखे, प्रा. भरत देशमुख, प्रा. डॉ. बिराजदार, ग्रंथपाल सूर्यकांत मस्के, प्रा. नानासाहेब काळे, जगन्नाथ क्षीरसागर आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य गव्हाणे म्हणाले, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन समानतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असून, त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. कल्याण सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सोमदेव शिंदे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संतोष बालगीर याने सायकलवर भारत भ्रमण करून १२ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास केल्याबद्दल त्याचा महाविद्यालयाकडून सत्कार करण्यात आला.
शाहू महाराजांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST