शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बाष्पीभवन वाढले; रेणा प्रकल्पात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: May 17, 2024 16:46 IST

पाणीटंचाईच्या झळा तीव्र, पाणी काटकसरीने वापर करणे गरजेचे

रेणापूर (लातूर) : अर्ध्या रेणापूर तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे झपाट्याने कमी होत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सद्य:स्थितीत या धरणात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे रेणापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी रेणापूर तालुक्यामध्ये कमी पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांना रेणा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे झपाट्याने होत असलेल्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. तसेच घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव आले आहेत. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

प्रकल्पावर विविध गावांच्या नळ योजना अवलंबून असून, रेणापूर तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्प आणि व्हटी हे दोनच मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर रेणापूर दहाखेडी, पानगाव बाराखडी, कामखेडा पाच खेडी, खरोळा, तसेच बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव यासह ३४ गावांच्या योजना अवलंबून आहेत. रेणा मध्यम प्रकल्पात सध्या ३.४० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवन झपाट्याने होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम सुरू...रेणापूर मध्यम प्रकल्प सद्य:स्थितीत ३.४० टक्के पाणी आहे. पाणी कमी झालेल्या क्षेत्रावरील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मदतीने केला जात आहे. त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी एक महिना पुरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन आहे.

प्रकल्पात १.१४ दलघमी मृत पाणीसाठा...रेणापूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थिती उपयुक्त पाणीसाठा ०.६९८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी एकूण पाणीसाठा १.८२८ दलघमी तर सरासरी ३.४० पाण्याची टक्केवारी आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन रेना प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले. पुढील महिनाभरात पाऊस सुरु होणार असल्याने तोपर्यंत प्रकल्पातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

दररोज १० ते ११ एमएमएने बाष्पीभवन...रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. त्यातील काही गावांत अधिग्रहण तर एका गावांत टँकरने पाणीपूरवठा होत आहे. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी