शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा; विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निदर्शने

By आशपाक पठाण | Updated: July 8, 2024 17:24 IST

जोपर्यंत विद्यापीठ स्थापना होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

लातूर : जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यार्थी संख्या लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे शक्य आहे. मात्र, राज्य सरकार यावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने सोमवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधी चौकात निदर्शने केली.

कृती समितीच्या वतीने वारंवार आंदोलन, निवेदन, डाक विभागामार्फत मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले. जोपर्यंत विद्यापीठ स्थापना होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून २००७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत लातूरला उपकेंद्र सुरू झाले. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, विधि, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय, तर कायम विनाअनुदानित ८२ असे जवळपास एकूण ११८ महाविद्यालये आहेत. याठिकाणी तब्बल ५५ हजार ४१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लातूरच्या शैक्षणिक, प्रशासकीय कामाचे स्वरूप लक्षात घेता विद्यार्थी, पालक, कर्मचाऱ्यांना नांदेडला जावे लागते. शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात महाविद्यालयाची संख्या १०९ असताना २०१४ मध्ये स्वतंत्र विद्यापीठ देण्यात आले. त्याच धर्तीवर लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी समन्वयक बालाजी पिंपळे, सिनेट सदस्य धनराज जोशी, ताहेरभाई सौदागर, प्रा शिरीषकुमार शेरखाने, जम्मालोद्दीन मणियार, अजयसिंग राठोड, फिरोज तांबोळी, दिगबर कांबळे, महेन्द्र गायकवाड, आकाश कांबळे, लहू जाधव खरोळे, किरण कांबळे, अतिश नवगिरे, ॲड. परमेश्वर इंगळे, स्वामी रत्नेश्वर, यशपाल ढोरमारे, श्रीकांत गंगणे, दिनेश डोईजड, राजू बुये, शंकर काळे, विकास माने, बिपिन चौहाण, वैशाली महालींगे, राहुल पवार, मंगेश डोबाळे, अमर पाचांगे, संतोष जाधव आदींची उपस्थिती होती.

निकषाची पुर्तता, तरी चालढकल...लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थी संख्या लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे गरजेचे आहे. आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी ते राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात आले. धरणे, स्वाक्षरी मोहीम , पोस्ट कार्ड मोहिम, महात्मा गांधी चौक लातूर येथे सलग चार दिवस उपोषण करून मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत स्वतंत्र विद्यापीठ होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मुख्य संयोजक ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducationशिक्षण