शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ

By राजकुमार जोंधळे | Updated: September 13, 2022 13:55 IST

रेल्वे प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे

लातूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड ते तिरुपती एक्स्प्रेस रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, अधिकारी आणि यंत्रणेच्या नियोजनाअभावी तिरुपतीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामीण भागातील यात्रेकरूंच्या अडचणीत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यांना तिरूपती दर्शनासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. या रेल्वेचे वेळापत्रक किमान तीन महिने आधीच जाहीर करावे, अशी मागणी त्रस्त प्रवाशातून होत आहे. 

मराठवाड्यातून तिरुपतीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. यासाठी थेट तिरुपतीसाठी धावणारी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. त्यानुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड येथून व्हाया परळी वैजनाथ - उदगीर - भालकी - बिदर - विकाराबाद - तिरूपती रेल्वे (क्रमांक ०७६३३) आणि परतीच्या प्रवासाला तिरूपती ते नांदेड एक्स्प्रेस (क्रमांक ०७६३४) सुरु करण्यात आली आहे. मात्र, ही रेल्वे कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी प्रवासी भारमनाचा प्रामुख्याने विचार होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आणि उत्पन्नाचा आलेख समाधानकारक राहिल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू करता येणार आहे. यासाठी, रेल्वे प्रशासनाने या रेल्वेचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करण्याची गरज आहे. प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकीट दोन दिवसांपूर्वीपर्यंत कन्फर्म होत नसल्याने भाविकांचा जीव टांगणीला लागला आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. शिवाय, रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. 

अन्यथा रायलसिमा एक्सप्रेसचा पर्याय...परळी वैजनाथ, उदगीर, भलकीसह बिदर जिल्ह्यातील भाविकांना जाण्यासाठी पूर्वी विकाराबाद रेल्वे स्थानक येथे जाऊन, रायलसिमा एक्स्प्रेस रेल्वेने तिरुपतीला जावे लागत होते. आता थेट नांदेड येथून तिरुपती एक्स्प्रेस सुरु झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, ही रेल्वे किती दिवस चालवली जाते, हे यंत्रणेच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. ही रेल्वे योग्य भारमानासह कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी नियोजनाची गरज आहे.

टॅग्स :laturलातूरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटtourismपर्यटन