शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

आवक घटल्याने तुरीची उच्चांकी भावाकडे धाव! सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये दर

By हरी मोकाशे | Updated: April 10, 2024 19:28 IST

बुधवारी केवळ १ हजार १९० क्विंटलपर्यंत आवक झाली होती.

लातूर: तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी वाढली असल्याने तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तुरीस सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. कमाल भाव १२ हजार ३१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याने एप्रिलमध्येच तुरीची उच्चांकी भावाकडे धाव होत असल्याचे दिसून येत आहे.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळतो म्हणून जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील तसेच कर्नाटक, तेलंगणा या सीमावर्ती भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. गत खरीपात विलंबाने पाऊस झाल्याने पेरण्यांना उशीर झाला होता. जिल्ह्यात एकूण ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. तुरीचे सरासरी क्षेत्र १ लाख १ हजार ७१६ हेक्टर क्षेत्र असले तरी केवळ ६४ हजार ३९६ हेक्टरवर पेरा झाला होता. तो ६३ टक्के असा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने व किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट झाली. परिणामी, बाजार समितीत आवक घटली आहे.

हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत आवक...

गत खरीप हंगामात पेरा कमी होण्याबराेबरच उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची आवक अल्प प्रमाणात होत आहे. सध्या दररोज जवळपास एक हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी केवळ १ हजार १९० क्विंटलपर्यंत आवक झाली होती.

एका आठवड्यात हजार रुपयांची वाढ...बुधवारी तुरीस १२ हजार ३१ रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला. सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये तर किमान १० हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. विशेषत: एका आठवड्यात जवळपास एक हजार रुपयांनी दर वाढले असल्याचे दिसून येत आहे.

आणखी दर वाढणार...

तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात आवकही घटली आहे. त्यामुळे दालमिलसाठी पुरेशा प्रमाणात तूर उपलब्ध होत नाही. शिवाय, जुना साठाही नाही. त्यामुळे दरवाढ होत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या कालावधीत तुरीला उच्चांकी जवळपास १२ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, यंदा एप्रिलमध्येच दर वाढले आहेत. आगामी काळात आणखीन दरवाढ होईल. - सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, दालमिल असो., उदगीर.

सोयाबीनचे दर स्थिर...

शेतमाल - आवक - साधारण दरगुळ - २८१ - ३५००

गहू - १०४ - २८००हायब्रीड - १०४ - २३००

ज्वारी - २६८ - ३०२५पिवळी - ११९ - ४०००

हरभरा - ५४५६ - ५९००तूर - ११९० - ११८००

करडई - १०७ - ४६७०सोयाबीन - ८६५७ - ४७००

टॅग्स :laturलातूर