शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या असमतोलामुळे पर्जन्यमानाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 19:19 IST

कमी होत चाललेला पाऊस चिंताजनक

- संदीप शिंदे

राज्यभरात सगळीकडे पावसाचे जोर कायम आहे़ मात्र मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे़ दिवसेंदिवस पर्जन्यमानाचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक आहे़ वृक्षसंवर्धन हा त्यावरील प्रमुख उपाय आहे़ त्यामुळे वृक्षचळवळीबरोबरच प्रदुषण कमी करण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत भुगोल तज्ज्ञ सुरेश फुले यांनी व्यक्त केले़ त्यांच्याशी साधलेला संवाद़़़

पावसाचे प्रमाण कमी होण्याची प्रमुख कारणे कोणती? 

मानव आणि निसर्गनिर्मीत कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे़ मराठवाड्याचा नैसर्गिकरित्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात समावेश होतो़ वृक्षाचे कमी झालेले प्रमाण, शहरीकरण, औद्यागीकीकरणाचे वाढलेले क्षेत्र, कृषी क्षेत्रात घट होऊन वाढणारे वस्तीकरण या कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे़ कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड या प्रदुषक तत्वाचे हवेमध्ये आवश्यकतेपेक्षा प्रमाण जास्त असल्यास प्रतिकुल परिस्थीती निर्माण होते़ परिणामी ढग येते पण पाऊस पडत नाही़ अशी स्थिती जिल्ह्यात सध्या दिसत आहे़

पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे ?  कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे, हवेचे प्रदुषण कमी करणे गरजेचे आहे़ लोकसंख्या वाढीमुळे सुख-सुविधा वाढत ्नचालल्या आहेत़ मात्र त्या पुरविण्यास निसर्ग असमर्थ होत चालला आहे़ निसर्गाचे संवर्धन आणि जतन होणे आवश्यक आहे़ तरच पावसाचे प्रमाण वाढविण्यास मदत होऊ शकेल़

पावसाची सरासरी कशाप्रकारे ठरविली जाते? मागील पावसाच्या सरासरीवर पर्जन्यमान ठरविले जाते़ गेल्या २५ ते ३० वर्षांत काळानुरुप पावसात घट होत आहे़ मराठवाड्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून ७० ते ८० टक्के पाऊस मिळतो तर ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे उर्वरीत पाऊस मिळतो़मराठवाड्यात वनाचे क्षेत्र अत्यल्प आहे़ ३३ वनक्षेत्राची आवश्यकता असताना लातूर जिल्ह्यात केवळ ०़०१ टक्के वनाचे क्षेत्र आहे़ त्यामुळे वनसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवड चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे़ इतर प्रदेशात वनक्षेत्र अधिक असल्याने पाऊसाचे प्रमाण समाधानकारक आहे़

वातावरणात सांद्रीभवन झाले तरच पाऊसशहराची वाढत चाललेली लोकसंख्या, वायुचे प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण, कृषी क्षेत्रात होत असलेल्या घटीमुळे वातावरणात अनपेक्षीत बदल होत आहे़ कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड या प्रदुषक तत्वाचे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाण असल्यास पाऊस पडण्यास प्रतिकुल परिस्थीती निर्माण होते़ वातावरणात सांद्रीकरण होणे गरजेचे आहे़ या प्रक्रीयेवरच पर्जन्यमान अवंलबुन असते़ सांद्रीकरण न झाल्यास पाऊसास विलंब होऊ शकतो़ असेही सुरेश फुले यांनी सांगितले़

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूरenvironmentपर्यावरण