शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसामुळे उदगीरातील बळीराजाने धरली चाढ्यावर मूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

उदगीर : उदगीर तालुका व परिसरात रविवारी रात्री जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणच्या ...

उदगीर : उदगीर तालुका व परिसरात रविवारी रात्री जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणच्या बळीराजाने खरिपासाठी चाढ्यावर मूठ धरली आहे. मृग निघाल्यापासून तालुक्यातील काही मंडलांत चांगला पाऊस झाला होता. रविवारच्या पावसाने तालुक्यातील सर्वच भागात पेरणीच्या कामाला गती मिळाली आहे.

तालुक्यात गेल्यावर्षी ६६ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. त्यापैकी ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, १३ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होता. त्यापाठोपाठ ज्वारी, उडीद, मूग आदी पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यावर्षी सोयाबीनला बाजारपेठेत मिळालेला विक्रमी दर पाहता, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

रविवारी रात्री झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला आहे. यापूर्वीच शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदी केली आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मृग वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनामुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून टाळेबंदी होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी चांगल्या घरगुती बियाण्यांचा शोध घेतला. सध्या बाजारपेठेत महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध नाही. त्याचबरोबर डीएपी खताचीही तिच स्थिती आहे.

ट्रॅक्टरचा वापर वाढला...

तालुक्यात अल्पभूधारकांची संख्या वाढल्याने पूर्वीप्रमाणे बैल बारदाना ठेवून शेती करणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीची कामे ट्रॅक्टरवर केली जात आहेत. पेरणीसाठीही ट्रॅक्टरचा वापर होत आहे. पेरणी लवकर व्हावी, म्हणून शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करण्याकडे कल वाढला असल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेर मंडलात सर्वात कमी पाऊस...

तालुक्यात सोमवारी सकाळपर्यंत उदगीर व नळगीर मंडलात सर्वात जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. हेर मंडलात सर्वात कमी पर्जन्यमान झाले. तालुक्यात आतापर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे : उदगीर ३०२, नागलगाव १९४, मोघा २२२, हेर ८४, वाढवणा १७३, नळगीर २६३, देवर्जन १४०, तोंडार १२० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी १८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बनशेळकी, हैबतपूर, नागलगाव, देवर्जन, मोघा, बेलसकरगा, मलकापूर, माळेवाडी, शेल्हाळ, वाढवणा, किनी यल्लादेवी, इस्मालपूर, डोंगरशेळकी आदी भागात खरीप पेरणीच्या कामाला वेग आला आहे.