डॉ. नारायणराव चाटे यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ८२ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय सावंत व वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हसनाळे यांच्या पुढाकारातून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आली.
दरवर्षी प्राचार्य डॉ. धनंजय चाटे हे शैक्षणिक उपक्रम राबवितात. यंदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करून त्नायां वर्षभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुस्तके व इतर सुविधा मोफत देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांची वर्षभराची शैक्षणिक जबाबदारी घेण्यात आली.
यावेळी डॉ. नारायणराव चाटे यांचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या. यावेळी उपसरपंच निसार देशमुख, मुख्याध्यापक किशन सोमवंशी, चिमेगावे, एम. एन. केंद्रे, सकनुरे, धनंजय जाधव, अलिम शेख, ज्ञानेश्वर पांचाळ, प्रा. गौतम बनसोडे, प्रा. डॉ. नारायण जायभाये, नाथा मद्रेवार, रंजित मुंढे आदी उपस्थित होते. (वा.प्र.)