बैठकीला अप्पर पाेलीस अधीक्षक हिम्मत जाधव, लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, चाकूर उपविभागीय पाेलीस अधिकारी विद्यानंद काळे, पाेलीस निरीक्षक संजय हिबारे, विकास तिडके, संजीवन मिरकले, सहायक पाेलीस निरीक्षक पवार, पाेलीस निरीक्षक गणेश कदम, स्थागुशाचे गजनन भातलवंडे, जिल्हा विशेष शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक निकम यांच्यासह समाजबांधव, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
विधायक उपक्रमाला प्राधान्य द्या...
काेराेनच्या संकट काळात विधायक आणि समाजाेपयाेगी कार्यक्रमांची गरज आहे. यासाठी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करावे. घराेघरी बाबासाहेबांना अभिवादन करावे, पुस्तक वाचनातून जयंती साजरी करावी. तर जयंती उत्सव मंडळांनी महारक्तदान शिबीरांचे आयाेजन करुन, माेठ्या प्रमाणावर तरुणांनी रक्तदान करावे, असेही जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.