पाच दिवसांनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:31+5:302021-05-11T04:20:31+5:30

२ लाख ७ हजार जणांनी घेतली पहिली लस लातूर जिल्ह्यात ४५ वर्षांवरील २ लाख ७ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक ...

Dosage to citizens above 45 years after five days | पाच दिवसांनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना डोस

पाच दिवसांनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना डोस

Next

२ लाख ७ हजार जणांनी घेतली पहिली लस

लातूर जिल्ह्यात ४५ वर्षांवरील २ लाख ७ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसऱ्या डोससाठी अनेकजण प्रतीक्षेत आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन याबाबत कालमर्यादा आहेत. त्यासंदर्भात संबंधितांना डोस देतानाच आरोग्य विभागाने सूचना केलेल्या आहेत. सध्या ३१ हजार ९०० कोविशिल्डचे डोस आले आहेत. कोव्हॅक्सिनचे १ हजार २४० लस उपलब्ध झाले असून, ही लस दुसऱ्या डोससाठीच प्राधान्याने दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

१८ ते ४४ साठी ८७०० लस

१ मे पासून सुरू करण्यात आलेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी लातूर जिल्ह्याला सोमवारी ८ हजार ७०० लस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे संबंधित केंद्रावर मंगळवारपासून लसीकरण होईल. मात्र या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून, आपणास दिलेल्या वेळेनुसारच रुग्णालयात यावे. नोंदणी नसलेल्यांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Dosage to citizens above 45 years after five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.