तृतीय पंथीयांसाठी जिल्हा व सत्र न्यायधीश आर.एस. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विधी-सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्या. सुनिता कंकणवाडी व अन्न आयोगाचे सदस्य ॲड. महेश ढवळे यांनी पुरवठा विभागाला तात्काळ शिधापञिका देण्यासाठी कार्यवाही करण्याचे सुचित केले हाेते. त्यानुसार पुरवठा अधिकारी के.डी देशमुख यांनी चार तासात शिधापत्रिका तयार केल्या. यावेळी न्या. कंकणवाडी म्हणाल्या, तृतीयपंथी हे देखील देशाचे नागरिक आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. या वेळी १५ तृतीय पंथीयांना शिधापञिका व मतदार नोंदणी अर्जाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महिला-बालकल्याण अधिकारी वर्षा पवार, नायब तहसीलदार महामुनी, बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डोंगरगे, प्रा.दिनेश मोने, पुरवठा निरीक्षक गणेश अंबर, लिपिक काळे, ग्राहक पंचायतचे शहराध्यक्ष इस्माईल शेख, विधी स्वयंसेविका ॲड. सुनैना बायस,तृतीय पंथीयांच्या गुरुमाऊली प्रीती, माऊली लातुरकर आदींसह त्यांचे तृतीयपंथी सहकारी उपस्थित होते.
१५ तृतीय पंथीयांना शिधापत्रिकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST