लातूर : संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती लातूर ग्रामीणच्या वतीने ८२ गावांतील पात्र असलेल्या ३ हजार ३३५ लाभार्थींना घरपोच अनुदान अर्जाचे वितरण करण्यात आले असल्याचे योजना समितीचे लातूर ग्रामीण अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले.
लातूर तालुक्यातील सलगरा खु. येथून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विजय देशमुख, उपसभापती मनोज पाटील, हरिराम कुलकर्णी, दगडूसाहेब पडिले यांनी सहकार्य केले. ८२ गावांतील पात्र लाभार्थींचे अर्ज भरून घेऊन समितीच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे निराधारांना शासकीय योजनांचा लाभ देणे सुलभ होणार असल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले. यशस्वितेसाठी सदस्य अमोल देडे, शीतल सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, रमेश पाटील, परमेश्वर पवार, आकाश कणसे, शीतल फुटाणे, नाथसिंह देशमुख, सुदाम रुकमे, स्वयंप्रभा पाटील, सुभाष घोडके, दैवशाला राजेमाने, गोविंद बोराडे, राजेसाहेब सवई, युवराज जाधव, अनिल पाटील, भैरवनाथ सवासे, बाळासाहेब बिडवे, भारत आदमाने, नवनाथ काळे, प्रताप पाटील, रमेश थोरमोटे, सहदेव मस्के, संभाजी रेड्डी, शंकरराव बोळंगे, अमृत जाधव, चंद्रकांत देवकते, धनराज पाटील, रघुनाथ शिंदे, विष्णूदास शिंदे आदींनी सहकार्य केले.