यावेळी बिटरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी शिंदे, पानगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री हुजरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत दहीफळे यांच्याकडे सदरील साहित्य कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी.पी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे धनराज पवार, मधुकर गालफाडे, शालुताई साके यांनी दिले. यात सॅनिटायझर, मास्क, ग्लोज, साबण, हॅण्डवॉश, थर्मल गन आदींचा समावेश आहे.
यावेळी ग्रामबाल संरक्षण समिती तथा ग्रामपंचायत सदस्य शिला आचार्य, आशा गटप्रर्वतक जयश्री थोरमोटे, औषध निर्माण अधिकारी राहुल जाधवर, आरोग्य सहायक पांडुरंग चाफेकानडे, आरोग्यसेवक युनूस शेख, तानाजी सूर्यवंशी, कनिष्ठ सहायक रामलिंग स्वामी, के.आर. शेख, एस.आय. सय्यद, अनिता महाके, राजाबाई कांबळे, शिंदे, रंजना इंदापुरे, नेहा सय्यद, नेहा कांबळे, आशा गतप्रवर्तक जयश्री थोरमोटे, के.आर. टोम्पे आदींची उपस्थिती होती.