काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील इंदरठाणा येथे हजरत शेकफरिद बाबा शकरगंज रहेमतुल्ला अलै दर्गास चादर अर्पण करण्यात आली. तसेच येथील गोरगरिबांना प्रत्येकी १० किलोंप्रमाणे गहू, तांदूळ वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील शाखेच्या परिसरात बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यातील बावची येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेणाचे संचालक लालासाहेब चव्हाण, गोविंद पाटील, तालुका फिल्ड ऑफिसर विजय देशमुख, शाखा व्यवस्थापक बी. एस. जाधव, महादेव उबाळे, कर्मचारी किसन ठाकूर, संजय पाटील यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, संगायोचे सदस्य ॲड. प्रशांत अकनगिरे, नगरसेवक रामलिंग जोगदंड, भूषण पनुरे, पाशामियाँ शेख, प्रकाश सूर्यवंशी, सचिन इगे, आदी उपस्थित होते.
गरजूंना अन्नधान्य वाटप; वृक्षारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST