शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अडचणीत बिनधास्त डायल करा ११२; लातुरमध्ये चार्ली पोलिसांची पेट्रोलिंग २४ तास राहणार !

By हणमंत गायकवाड | Updated: June 22, 2023 19:45 IST

मोटारसायकलच्या संख्येत वाढ, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत

लातूर: चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी मोटारसायकलच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सायरन, अलौसिंग सिस्टीम, वाकीटॉकीसह कम्युनिकेशनसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. चार्ली पोलिस पेट्रोलिंग शहरात २४ तास राहणार आहे. त्या अनुषंगाने २४ पोलिस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना विशेष असे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लातूर शहरांमध्ये चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग यापूर्वी होती. मात्र, कामगिरी व त्याचे फायदे लक्षात येऊनही यंत्रणा सक्षम नव्हती. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी चार्ली पोलिस पेट्रोलिंगची कामगिरी लक्षात घेता, ही पद्धत अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंगच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सहा मोटारसायकली होत्या. आता १२ झाल्या आहेत. चार्ली पोलिस पेट्रोलिंग शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये २४ तास राहणार आहे. त्या मोटारसायकलवर आळीपाळीने ड्युटीकरिता एकूण २४ पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार्ली पोलिस पेट्रोलिंग अधिक प्रभावी व्हावी याकरिता चार्ली मोटारसायकलवर पेट्रोलिंग व नेमण्यात आलेले पोलिस अंमलदारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून सायरन, अलाैंसिंग सिस्टीम तसेच रात्रीच्यावेळी चार्ली मोटारसायकल लवकर ओळखू यावी, याकरिता लाल व निळ्या रंगाची ब्लिंकर्स लाईट लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे चार्ली पोलिस पेट्रोलिंग मोटारसायकलला एखाद्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता येऊन अलाैसिंग सिस्टीम करून सूचना देता येणार आहेत तसेच चार्ली पेट्रोलिंगवरील पोलिस अंमलदार यांच्याकडे स्वयंचलित शस्त्र व वायरलेस वाॅकीटाकी राहणार आहे. चार्ली पेट्रोलिंग ड्युटीवर असलेल्या पोलिसांना एकमेकांशी संपर्क करता येणार आहे. चार्ली पेट्रोलिंगद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महिलांना, लहान बालकांना व वयोवृद्धांना त्वरित मदत मिळणार आहे.

मदत हवी असल्यास ११२ वर करा डायल....ट्रॅफिक जाम, भांडण, तक्रारी, अनुचित घटना घडत असताना डायल ११२ वर कळविल्यावर लगेच चार्ली पोलीस पेट्रोलिंगची मोटारसायकल त्या ठिकाणी पोहोचणार आहे. अडचणी सापडलेल्या लोकांनी डायल ११२ वर कॉल करून मदत मागितल्यास चार्ली पोलीस पेट्रोलिंग त्वरित पोलिस अंमलदार त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. नागरिकांनी त्यांना पोलिस मदत पाहिजे असल्यास त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ११२ असे टाईप करून कॉल केल्यास त्यांना तत्काळ चार्ली पोलीस पेट्रोलिंगकडून मदत पुरविण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसlaturलातूर