शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डायल @ ११२ हेल्पलाईनवर खोडसाळपणाने खुनाचा कॉल; किनगाव ठाण्यात एकाविरोधात गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: March 25, 2024 18:25 IST

माहिती मिळताच सहायक फौजदार कल्याणे, सुनील श्रीरामे यांच्यासह इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

किनगाव (जि. लातूर) : पोलिस दलाच्या डायल @ ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर सताळा गावात खून झाल्याचा कॉल आला. याची माहिती तातडीने संबंधित किनगाव पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र, अशी घटनाच घडली नसल्याचा प्रकार समोर आला. हा कॉल कोणीतरी खोडसाळपणाने केला असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी सांगितले, आपत्कालीन सेवेसाठी पोलिसांनी सुरु केलेल्या डायल @ ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर एका व्यक्तीने रविवारी रात्री १०:१४ मिनिटाला कॉल केला. अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक खून झाला आहे, अशी माहिती सांगून कॉल कट केला. याची माहिती हेल्पलाईनवर सेंटरवरून किनगाव ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच सहायक फौजदार कल्याणे, सुनील श्रीरामे यांच्यासह इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सताळा गावात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले. याबाबत गावचे पोलीस पाटील बालिका उपगंडले, ग्रामस्थ सुदर्शन उपगंडले, अविनाश काळे, मुस्तफा शेख यांच्याकडेही पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, त्यांनीही गावात अशी घटना घडली नसल्याचे सांगितले. हा प्रकार कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणाने केला आहे, हे स्पष्ट झाले. 

याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल सुनील श्रीरामे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शासकीय तक्रार सुविधा डायल @ ११२ क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती दिल्याप्रकणी कलम १७७ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास किनगाव ठाण्याचे पोलिस करीत आहेत.