शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह, धुम्रपान, कमी वजन; लातूर जिल्ह्यातील सव्वातीन लाख व्यक्ती क्षयरोगाच्या अतिजाेखमीत!

By हरी मोकाशे | Updated: August 6, 2024 12:46 IST

लातूर जिल्ह्यात गृहभेटीतून १६ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

लातूर : मधुमेह, धुम्रपान, कमी वजन अशा कारणांमुळे जिल्ह्यातील १८ वर्षांपुढील ३ लाख २८ हजार ५०६ व्यक्ती क्षयरोगाच्या अति जोखमीच्या कक्षेत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे अतिजोखमीतील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी सर्वस्तरीय अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षय रुग्णांना मोफत गोळ्या- औषधी देण्यात येतात. तसेच पोषक आहारासाठी शासनाकडून आर्थिक मदतही दिली जाते. शिवाय, जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने निक्षय मित्र बनवून अन्नदाता उपक्रम राबविला आहे. दरम्यान, क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात आली. जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने सहा निकषानुसार जिल्ह्यात नुकतेच १८ वर्षांपुढील अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात १५ लाख ६६ हजार ९८८ व्यक्तींची माहिती घेण्यात आली असता ३ लाख २८ हजार ५०६ जण अतिजोखीम गटात आढळले आहेत.

लातुरात सर्वाधिक जोखीमग्रस्त व्यक्ती...अहमदपूर - २८६९७औसा - ४४८४७चाकूर - २५२६०देवणी - १६०९९जळकोट - १२९०६निलंगा - ३९२४२रेणापूर - १९५८१शिरुर अनं. - १७०७४उदगीर - ३५७६९लातूर - ८९०३१

सहा निकषांअधारे जिल्ह्यात सर्वेक्षण...मागील पाच वर्षांत टीबी झाला होता का, मागील तीन वर्षांत टीबी रुग्णाच्या सहवासात असलेल्या व्यक्ती, मधुमेह, धुम्रपान, वजन कमी असलेली व्यक्ती आणाि ६० वर्षांपुढील व्यक्ती अशा सहा निकषांच्या आधारे गृहभेटीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

क्षयरोगाचे सध्या जिल्ह्यात १६०३ रुग्ण...सध्या जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ६०३ रुग्ण आहेत. त्यांना शासनाच्या वतीने मोफत गोळ्या- औषधी देण्यात येत आहेत. तसेच सकस आहारासाठी शासनाकडून रक्कमही दिली जात आहे. त्याचबरोबर निक्षय मित्रांच्या माध्यमातून पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

क्षयरोगाचा संसर्ग थुंकी, खोकल्यातून...क्षयरोगाचा संसर्ग हा थुंकी, खोकल्यामुळे हवेतून होतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, काखेत अथवा मानेभोवती गाठ येणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत. क्षयरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची लवकरात लवकर तपासणी करुन उपचार करणे महत्त्वाचे ठरते.

जिल्ह्यात लवकरच लसीकरण मोहीम...अतिजोखमीतील व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना मोफत बीसीजी लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या दाेन वर्षांनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याचे आढळून येईल.- डॉ. एस.एन. तांबारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य