देवणी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख पंडित भंडारे होते. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबनअप्पा महाराज रेश्मे, जिल्हा महिला संघटक शोभाताई बेंजरगे, निलंगा तालुकाप्रमुख अविनाश रेश्मे, राहुल मातोळकर, प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, भागवत वंगे, शिवाजी माने आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक संताजी पाटील भोपणीकर यांनी केले. आभार यशवंत ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी लाला पालेकर, अमोल भोसले, मुकेश सुडे, बालाजी बिरादार, लक्ष्मण बिरादार, रंजीत दोडके आदींनी परिश्रम घेतले.
नगरपंचायतीवर भगवा फडकावा...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवणीचा विकास होत आहे. यापुढेही शहराच्या विकासाबरोबरच तालुक्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवावा, असे आवाहनही माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी केले.