यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, मंडळ कृषी अधिकारी अनिल शेळके, कृषी पर्यवेक्षक संतोष पाटील, कृषी सहायक सुनील घारुळे, साहेबराव सोनकांबळे, आत्माचे करमचंद राठोड, तुकाराम सुगावे उपस्थित होते. प्रारंभी दिवेकर यांनी येथील मुख्य चौकात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या जनजागृतीसाठीच्या कृषी चित्ररथास हिरवा झेंडा दाखविला. शेतकऱ्यांनी पीक विमा भरून आपल्या पिकांचे विमा संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी दापका येथील देशमुख यांच्या विकेल ते पिकेल योजनेअंतर्गतच्या टरबूज व मिरचीबद्दल माहिती घेतली. निलंग्यातील गोविंद शिंगाडे यांनी केलेल्या १० एकरवर रुंद सरी वरंबा पद्धतीवरील सोयाबीन प्लॉटची पाहणी केली. मंडळ कृषी अधिकारी रणजित राठोड व कृषी सहायक सुनील घारुळे यांनी मंडळात बीबीएफसंदर्भात चांगले काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
हलगरा येथील प्रगतिशील शेतकरी गुणवंत गायकवाड यांच्या पोकराअंतर्गतच्या शेडनेटची पाहणी केली. अंबुलगा मेन येथील शेतकरी गुणवंत शिंदे यांच्या मनरेगामधील फळबाग लागवडीचा प्रारंभ केला. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावे, असेही ते म्हणाले. त्यानंतर अंबुलगा मेन येथील शेतकरी उल्हास आंबेगावकर यांच्या बांबू लागवड व सोयाबीनची टोकन लागवडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.