लातूर : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजना प्रभावीपणे राबवून गरजूंना घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी गरिबी निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत अनेक घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये पहिला, दुसरा हप्ता टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत आहे. पैसे न दिल्यास रक्कम खात्यावर वर्ग केली जात नाही. त्यामुळे बांधकामाला व्यत्यय येतो, याबाबतची चौकशी करून कारवाई करावी. तसेच घरकुलाचा लाभ गरजूंना द्यावा, असेही संघटनेचे अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, जिल्हाध्यक्ष नामदेव शृंगारे, केशरबाई मळवटीकर, अक्षय मळवटीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST