शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2023 19:05 IST

तहसीलमधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते.

रेणापूर : रेणापूर तहसील कार्यालयातील काही कर्मचारी शुक्रवारी सकाळी वेळेत कार्यालयात आले नसल्याचे पाहून संताप व्यक्त करीत प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे अर्धा तास ये- जा बंद झाली होती.

येथील तहसीलमधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. यासंदर्भात काही नागरिकांनी तक्रारी देऊनही दखल घेण्यात आली नव्हती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजेपर्यंत तहसीलमधील काही कर्मचारी आले नव्हते. त्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांनी येऊन सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत तहसीलच्या दोन्ही प्रवेशद्वाराला कुलूप लावले. त्यामुळे उशिरा आलेले कर्मचारी बाहेरच होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, बीट अंमलदार अनंत बुधोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन राठोड व कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच नायब तहसीलदार श्रावण उगिले यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे कुलूप काढण्यात आले.

१० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस...या प्रकरणाची तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी गंभीर दखल घेऊन उशीरा येणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालय, कृषी, भूमी अभिलेख, सहाय्यक निबंध, उपकोषागार कार्यालयासही सूचना करुन कर्मचाऱ्यांनी वेळेत येण्याच्या खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. यापुढे उशीर झाल्यास कार्यवाही करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

तीव्र आंदोलन छेडणार तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नाहीत. जर यापुढेही असेच आढळून आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांनी दिला आहे.

टॅग्स :laturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूर