शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By हणमंत गायकवाड | Updated: August 18, 2023 18:17 IST

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी.

लातूर : जिल्ह्यात गेल्या वीस-बावीस दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. यामुळे पिकांनी माना टाकल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी. या आठवड्यात शासनाने दुष्काळ जाहीर नाही केला तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. जिल्ह्यातील शेतकरी सोबतीला घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाचे नुकसान होत आहे. अशा शेतकऱ्यांनाही हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी. पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी हरिण, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा प्रतिबंध करावा. जिल्ह्यातील पिके वाळत असल्याने पीक विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम तत्काळ द्यावी. ९९२ व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या विविध उत्पादन कंपन्यावर कारवाई करण्यात यावी. खत बियाणांची लिंकिंग तसेच कीटकनाशकांची विक्री चढ्या दराने करणाऱ्या कृषी दुकानदारांवर ही कारवाई करावी. गोगलगाय व इतर अन्य रोगामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तत्काळ मदत करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मंत्र्यांना फिरू देणार नाही..आठवडाभरात कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास मराठवाड्यातील कोणत्याच जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलन दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कृषी विभागाचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला.

शासनाच्या विरोधात घोषणाबाजी....प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, सचिन क्षीरसाट, प्रीती भगत, किरण चव्हाण, अंकुश शिंदे, वाहिद शेख,सचिन बिराजदार, संग्राम रोडगे, महेश बनसोडे, सोमनाथ कलशेट्टी, महेश देशमुख,श्रीनिवास शिंदे, महेश माने, अनिल जाधव,रामदास पाटील, संतोष भोपळे, सुनील तोडचिरकर, परमेश्वर पवार, जहांगीर शेख, बजरंग ठाकूर, अजिंक्य मोरे, ऋषिकेश माने, संतोष जाधव, शुभम चंदनशिवे, रामदास तेलंगे, गुरुदास घोणसे, अनिल भंडे, पवन राजे, दत्ता महात्रे, लाला मोहिते, पवन सरवदे, सचिन इगे, सुरेश गालफाडे आदींनी सहभाग घेत घोषणाबाजी केली.

टॅग्स :laturलातूरdroughtदुष्काळRainपाऊस