लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी काँग्रेस भवन येथे झाली, यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री मोघे म्हणाले, मोदी सरकारची नोटाबंदी हा देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. इंदिरा गांधींना नाव ठेवणाऱ्या भाजपला हे लक्षात नाही की इंदिरा गांधी यांनी २२ कलमी कार्यक्रमातून लोकांच्या जीवनात प्रकाश आणला. भूमिहीन लोकांना जमिनी दिल्या, त्यांना घरे दिली़ आजही इंदिरा आवास योजना त्याच्याच नावाने सुरू आहे़ लातूर जिल्हा काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक बॅग रक्त संकलन केले आहे़
कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भूमिका वेळोवेळी लोकांसमोर मांडाव्यात, पक्ष मजबुती करण्यासाठी काम करावे़ अध्यक्षीय भाषण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी केले़ ते म्हणाले, लातूरच्या काँग्रेसला लोकनेते विलासराव देशमुख,माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा वारसा आहे़ तोच वारसा पालकमंत्री अमित देशमुख, आ़ धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष जाेपासत आहे़ प्रास्ताविक लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केले़ यावेळी माजी जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, अभय साळुंके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती हाेती़