या गावांचा दहा दिवस वीजपुरवठा बंद... लातूर तालुक्यातील टाकळगाव, कानडी बोरगाव, तांदुळजा, गादवड, सारसा, मसला, पिंपळगाव, वांजरखेडा, तर कळंब तालुक्यातील शिराढोण, दाबा, आवाड शिरपुरा, सौंदणा, लासरा, वाकडी, तट बोरगाव या गावांतील वीजपुरवठा १३ ते २३ मेपर्यंत खंडित करण्यात आला आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी लातूर, उस्मानाबादच्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र दिले आहे. सरसकट वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ज्यांच्या कालव्याच्या पाण्याचा संबंधच नाही, अशा शेतकऱ्यांची गैरसोय का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरसकट वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST