शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीत सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 18:23 IST

बॅरेजेसच्या लोखंडी प्लेट्सची चोरी : औराद शहाजानी पोलिसांची कारवाई

- राजकुमार जोंधळेलातूर : शेळगी  (ता. निलंगा) येथे बुधवारी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद करण्यात आली. यावेळी औराद शहाजानी पोलिसांनी त्यांच्याकडून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी चोरी व घरफोड्या रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औराद शहाजानी पोलिसांनी १९ जुलैच्या रात्री ११ वाजेपासून २० जुलैच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत नाकाबंदी केली. या नाकाबंदीत औराद शहाजानीकडून निलंग्याकडे जाणाऱ्या एका मालवाहू मिनी टेम्पोचा संशय आला. पोलिसांनी टेम्पो थांबवून चौकशी केली. ‘वाहनामध्ये काय आहे?’ असे विचारले असता ज्वारी असल्याचे सांगितले. 

पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता वाहनात बॅरेजेसवरील लोखंडी प्लेट असल्याचे दिसून आले. यावेळी पळून जाणाऱ्या संशयित व्यक्तींचा पाठलाग करून एकाला ताब्यात घेण्यात यश आले. त्याची चौकशी केली असता हनुमंत पांडुरंग मोरखंडे (रा. अनंतवाडी, ता. देवणी) असे त्याने नाव सांगितलेले. चोरलेल्या लोखंडी प्लेट हे वांजरखेडा बॅरेजेवरील असल्याचे सांगितले. दरम्यान, विशाल संभाजी पाटील, विकास करण बिराजदार व एक बालक (सर्व रा. कोराळी, ता. निलंगा) येथील असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे यांची तपास पथके तयार करून पळून गेलेल्या आरोपीच्या मागावर रवाना केले. कासारशिरसी, कोराळी तसेच उमरगा या ठिकाणी आरोपींचा शोध घेऊन त्यांना २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले.

याबाबत बीट प्रमुखांच्या तक्रारीवरून औराद शहाजानी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून लोखंडी प्लेट, एक टेम्पो, दोन मोटारसायकल असा एकूण सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर