शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Crime: १९६५ मध्ये म्हशींची चोरी;आरोपीला तब्बल ५८ वर्षांनंतर अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: September 16, 2023 05:26 IST

Crime News: १९६५ मध्ये म्हैस चोरल्याच्या प्रकरणाचा तपास आणि आरोपीचा शोध ५८ वर्षे सुरूच होता. शेवटी कर्नाटक राज्यातील बिदर पोलिसांनी गुन्ह्याचा निपटारा करताना, आरोपीला १२ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

- दयानंद बिरादारऔराद बाऱ्हाळी (जि.बिदर) : १९६५ मध्ये म्हैस चोरल्याच्या प्रकरणाचा तपास आणि आरोपीचा शोध ५८ वर्षे सुरूच होता. शेवटी कर्नाटक राज्यातील बिदर पोलिसांनी गुन्ह्याचा निपटारा करताना, आरोपीला १२ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाने आरोपीचे ७८ वय लक्षात घेऊन जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी सांगितले, १९६५ मध्ये मेहकर येथील मुरलीधर माणिकराव कुलकर्णी यांच्या दोन म्हशी आणि एक वासरू चोरीला गेले होते. त्यावेळी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासामध्ये चोरी गेलेले पशुधन उदगीर तालुक्यातील कुणकी येथे सापडले. ते तक्रारदाराकडे सोपविण्यात आले, परंतु गुन्ह्यातील आरोपी गणपती व एका साथीदार आरोपीचा पोलिस शोध घेत होते. त्यावेळी त्यांना अटकही झाली, परंतु ते जामिनावर असताना पुन्हा पसार झाले. त्यांच्या विरोधातील अटक वॉरंट कायम हाेते.

दरम्यान, बिदरचे पोलिस अधीक्षक चलबसवण्णा लंगोटी यांनी प्रलंबित व दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा निपटारा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. याच मोहिमेतील सर्वात जुना गुन्हा समोर आला. १९६५ मध्ये २० वर्षांचा असलेला आरोपी आता ७८ वर्षांचे वृद्ध आजोबा आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे ताब्यात घेऊन पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या गुन्ह्यातील तक्रारदार मुरलीधर कुलकर्णी, तसेच दुसऱ्या एका आरोपीचे निधन झाले आहे.

कानून के हाथ लंबे होते हैं...या घटनेची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. पुन्हा एकदा कानून के हाथ लंबे होते हैं, हा डायलॉगही चालवित आहेत. पोलिस दस्ताऐवजातील ५८ वर्षांची नोंद कायम राहिली. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्ह्यांच्या नोंदी वर्षानुवर्षे तपासाचा भाग बनून राहतात, हे लक्षात घेऊन बिदर पोलिस अधीक्षकांनी उघडलेली मोहीम अनेक जुन्या गुन्ह्यांची उकल करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी