शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: लातुरातील सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध, पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे यांचा झटका

By राजकुमार जोंधळे | Updated: December 24, 2022 17:54 IST

Crime News: वाढत्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यान्वये एका खतरनाक गुंडावर कारवाई केली.

- राजकुमार जोंधळे लातूर - वाढत्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यान्वये एका खतरनाक गुंडावर कारवाई केली. सार्वजनिक शांतता धाेक्यात असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईचा प्रस्ताव मंजूर केला. सराईत गुंडाला ‘एमपीडीए’खाली स्थानबद्ध करण्याची केलेली कारवाई लातूर जिल्ह्यातील पहिलीच आहे.

लातुरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी, त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. वाढणाऱ्या गुन्हेगारीला राेखण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गत आकाश अण्णासाहेब होदाडे (वय २५, रा. कवठा ता. औसा, ह. मु. न्यू भाग्यनगर, लातूर) याच्यावर कारवाई केली. एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश अण्णासाहेब होदाडे याला ‘एमपीडीए’ कायद्याखाली एका वर्षासाठी स्थानबद्ध करुन, जिल्हा कारागृहात रवानगी केली. त्याच्यावर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, कट रचून-भीती घालून खंडणी उकळणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करून दहशत करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला.

काय आहे एमपीडीए कायदा..?महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अक्टिव्हिटी) होय. सराईत गुन्हेगार, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अशी कारवाई करता येते. यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करता येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर