शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : लातूरात भरदिवसा कोयत्याने सपासप वार करुन विद्यार्थ्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 18:52 IST

लातुरात खळबळ, पोलीस अॅक्शन मोडमध्ये

लातूर : इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लातुरातील विशाल नगर भागात असलेलया श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर विद्यार्थ्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लातूर शहरातील मोती नगर भागात वास्तव्याला असलेला रोहन सुरेश उजळंबे (२०) हा मुळचा लोदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. तो इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, विशाल नगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारा तो थांबवला होता. यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने रोहनच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानकपणे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. काही समजायच्या आतच मारेकरी मोटरसायकलवरुन पासर झाल्याचे प्रत्यक्षर्शींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

भरदिवसा घडलेल्या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली. घटनेमुळे दुकानदारांनी तातडीने दुकानंही बंद केली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली असता, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी घटनास्थळी भेट दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहन उजळंबे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संशयीत मित्रांना घेतले ताब्यात...पोलिसांनी तातडीने त्याच्या वर्तुळातील पाच मित्रांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. खुनामागचे कारण मात्र, अद्याप समोर आले नाही. मयत रोहन उजळंबे आणि मारेकऱ्यामध्ये नेमका काय वाद होता? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी...विशालनगर परिसरातील हा परिसर साई मंदिरामुळे अत्यंत वर्दळीचा, गजबजलेला असतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मयत रोहन हा येथे कशासाठी आला होता? मारेकरी त्याच्या मागावर होते का? याचाही तपास सुरु आहे. भर दुपारी दिवसा मारेकऱ्याने रोहनवर कोयत्याने हल्ला केला. घटनास्थळावर पडलेला कोयता, सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहेत.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी