शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती

By संदीप शिंदे | Updated: September 7, 2024 20:35 IST

दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण

निलंगा : तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी सहा गेट १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

मागील काही दिवसांपासून मसलगा मध्यम प्रकल्पाच्या कारभाराचे धिंडवडे उडत असून, आठ दिवसांपूर्वी तलाव १०० टक्के भरून धोक्याची पातळी ओलांडत असतानाचे फोटो एका शेतकऱ्याने समाज माध्यमातून व्हायरल केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रकल्प प्रशासनाने दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला. ही घटना ताजी असतानाच मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची लांब भेग पडल्याचे येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निदर्शनास चार दिवसांखाली आली होती. त्यादिवशी भेगेची रुंदी चार इंच इथपर्यंत होती. मात्र तिच भेग शुक्रवारी चार इंचावरून दहा इंचापर्यंत वाढल्याने घाबरून गेलेल्या शेतकरी साळुके यांनी याच ठिकाणी उभारून व्हिडीओ करत चार दिवसांत एवढी मोठी भेग वाढत जात असताना प्रकल्प प्रशासन झोपा काढत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदरील वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता पवार, उपअभियंता जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे सहा दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

४० ते ५० टक्क्यांपर्यंत विसर्ग करण्याचे आदेश...मसलगा मध्यम प्रकल्पातून येत्या काही दिवसांत ४० ते सोळ नाल्याद्वारे मांजरा नदी पात्रात सोडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे जोजारे यांनी सांगितले, तर अमरसिंह पाटील यांना विचारले असता गतवर्षी तलावात पाणी उपलब्ध नसल्याने आणि यंदा जोरदार पाऊस होऊन एकदम पाणीसाठा १०० टक्के भरल्याने असा प्रकार घडला असावा किंवा इतर कोणते कारण असावे याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमला पाचारण केले आहे. खबरदारी म्हणून ३० टक्के पाणीसाठा कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा करणार...मुळात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने असा प्रकार घडत आहे. येथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रोजंदारीवरील कामगार देखरेख करत आहेत. अनेक गावांची तहान भागवणारा एवढा मोठा प्रकल्पाची काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गतवर्षी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आता पाणी सोडून दिल्यानंतर उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणण्याची वेळ येईल, अशीही तीव्र भावना येथील नागरिकांनी बोलून दाखविली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीDamधरण