लातूर : तालुक्यातील शिऊर येथे गुरुवारी गावातील ४५ वर्षांपुढील ग्रामस्थांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. माजी तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या पाठपुराव्यामुळे ही लस मिळाली. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रताप पाटील, पंचायत समिती सदस्य अडसुळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, पोलीसपाटील उद्धव बिडवे, माजी सरपंच मनोज गोमारे, सचिन सूर्यवंशी, मुख्याध्यापक यादव, सोदले, ग्रामसेवक आर. जे. बनसोडे, आदी उपस्थित होते. लसीकरणासाठी गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. इगे, डॉ. कोळ्ळे, डॉ. कल्पेश लांडे, डॉ. किरण नाईकवाडे यांचे सहकार्य मिळाले. दरम्यान, गावात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गृह अलगीकरणावर भर दिला जात आहे. गावात ॲन्टी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
शिऊर येथे कोविड लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST