शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : खोकला, ताप आल्याने अमित देशमुख यांची कोरोना चाचणी; अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 21:13 IST

खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे, असे वैद्यकीय निर्देश आहेत.

लातूर - खोकला व ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोना चाचणी करून घेतली. दरम्यान, बुधवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे, असे वैद्यकीय निर्देश आहेत. त्यानुसार खोकला व ताप आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना चाचणी करून घेतली. बुधवारी त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असून काळजीचे कारण नाही.या संदर्भात पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले, आपल्याला ताप व खोकला आजाराची लक्षणे असताना इतरांना प्रादुर्भाव होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी चाचणी करून घेतली. राज्य शासनाकडून कोविड-१९ संदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे सर्वांनीच पालन तसेच हेल्पलाईनला संपर्क केला पाहिजे, असे ते म्हणाले.घाबरू नका, तपासणी करून घ्या...सर्दी, खोकला, ताप असेल तर घाबरून जाऊ नका. आपला आजार, लक्षणे लपवू नका.  आपल्यामुळे आई, वडील, कुटुंब, शेजारी व समाजात संसर्ग होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे असे स्पष्ट करीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, चार दिवस घरून काम करीन. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल. दरम्यान, आ. धीरज देशमुख यांनी पालकमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून, काळजीचे कारण नाही. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी म्हणून लक्षणे दिसल्यास तपासणी करून घेतली पाहिजे, असे सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmit Deshmukhअमित देशमुख