शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ४ पॉझिटिव्ह; दोघे मुंबईहून आलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 01:06 IST

दोघे मुंबईहून आलेले तर दोघे कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.

लातूर : मंगळवारी रात्री साडेबारा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार लातूर जिल्ह्यात आणखी ४  जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात दोघे मुंबईहून आलेले तर दोघे कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटिव्ह आलेला एक अहमदपूर तालुक्यातील खंडाळीचा व एक बोरगावचा आहे, दोघेही मुंबईहून आलेले आहेत.

दरम्यान उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात एकुण ३५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यात एका व्यक्तीचा अहवाल  पॉझिटीव्ह व  ३४ अहवाल निगेटीव्ह आहेत, चाकुर येथुन ६ व्यक्तींचे  स्वॅब तपासणीसाठी आले हाते, ते सर्वच  निगेटिव्ह  आले आहेत, जळकोट येथील १० व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले, त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.

लातुर जिल्हयातील एकुण ६७ स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४ पॉझिटीव्ह असुन ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले तर  एक प्रलंबित व एक रद्द झाला आहे, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर, विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर